लेख- मित्र -पुराण- राजेंद्र कोल्हेकर
नमस्कार, ई-दै- काव्यांगण " 29-09-2023 अंकात प्रकाशित ललित लेख- मित्र-पुराण- राजेंद्र कोल्हेकर टीम-काव्यांगण चे आभार. -अरुण वि देशपांडे-पुणे 9850177342 --------------- ----- लेख- मित्र -पुराण - राजेंद्र कोल्हेकर ------------------------------- नमस्कार - मित्र हो - नोकरीच्या काळातले मित्र , रिटायर झाल्यावर पुन्हा जेव्हा भेटतात ,तेव्हा आपण जुन्या काळात जातो .त्या आठवणीचे " हे मित्र-पुराण ". पारिवारिक समारंभ निमित्ताने मी अमरावतीला गेलो होतो. मित्र राजेंद्र कोल्हेकरला फोन केला, 'भेटू या ! ईच्छा व्यक्त केली. कोल्हेकर स्कुटी घेऊन हजर सुद्धा झाला. राजपेठेतील गणेश कॉलोनीतल्या त्याच्या घरी गप्पा बैठक झाली. आरंभीचे दिवस आठवले - 1983 साल असेल. मी हैद्राबाद बँकेच्या गंगाखेड -ब्रँचला होतो. परभणी मेन ब्रँचला माझे वडील ती.(कै)-बाप्पा, व्ही. एच.देशपांडे मॅनेजर होते. मेन ऑफिसच्यावर मॅनेजर क्वार्टरमध्ये आमचा मुक्काम असे. 1983-85 या काळात रविवारी परभणीला आलो की दुपारच्या वेळी खाली बँकेत जाई . सुट्टीच्या दिवशी कुणी ना कुणी स्टाफ मेम्बर काम करीत बसलेला असे. मेन ऑफिसच्या हॉलम...