लेख- मित्र -पुराण- राजेंद्र कोल्हेकर
नमस्कार, ई-दै- काव्यांगण " 29-09-2023 अंकात प्रकाशित ललित लेख- मित्र-पुराण- राजेंद्र कोल्हेकर
टीम-काव्यांगण चे आभार.
-अरुण वि देशपांडे-पुणे
9850177342
--------------- -----
लेख- मित्र -पुराण - राजेंद्र कोल्हेकर
-------------------------------
नमस्कार - मित्र हो -
नोकरीच्या काळातले मित्र , रिटायर झाल्यावर पुन्हा
जेव्हा भेटतात ,तेव्हा आपण जुन्या काळात जातो .त्या आठवणीचे " हे मित्र-पुराण ".
पारिवारिक समारंभ निमित्ताने मी अमरावतीला गेलो होतो.
मित्र राजेंद्र कोल्हेकरला फोन केला,
'भेटू या ! ईच्छा व्यक्त केली.
कोल्हेकर स्कुटी घेऊन हजर सुद्धा झाला.
राजपेठेतील गणेश कॉलोनीतल्या त्याच्या घरी गप्पा बैठक झाली.
आरंभीचे दिवस आठवले -
1983 साल असेल. मी हैद्राबाद बँकेच्या गंगाखेड -ब्रँचला होतो.
परभणी मेन ब्रँचला माझे वडील ती.(कै)-बाप्पा,
व्ही. एच.देशपांडे मॅनेजर होते.
मेन ऑफिसच्यावर मॅनेजर क्वार्टरमध्ये आमचा मुक्काम असे.
1983-85 या काळात रविवारी परभणीला आलो की
दुपारच्या वेळी खाली बँकेत जाई .
सुट्टीच्या दिवशी कुणी ना कुणी स्टाफ मेम्बर काम करीत बसलेला असे.
मेन ऑफिसच्या हॉलमध्ये (त्यावेळी) कोपऱ्यातल्या टेबलावर शनिवारची क्लिन-कॅश बुक लिहीत बसलेला एक नवा स्टाफ मेम्बर दिसायचा .
गोरापान, काळीभोर दाढी, नीट-नेटका ड्रेस " अशा या देखण्या बटू-मूर्तीचे "त्याकाळीचे असे दिसणे, असणे, रहाणे, माझ्यासाहित बहुसंख्य स्टाफच्या तुलनेत दुर्मिळ होते.
परिचय झाल्यावर कळाले , राजेंद्र कोल्हेकर 1981 बॅचचा .
पुढच्या दर भेटीत त्याचा प्रसन्न - निर्मळपणा जाणवे. हसण्यात- बोलण्यातला मिस्कीलपणा , हातात हात देऊन "यस" म्हणण्याची स्टाईल, पाहून
" बरं, येतो पुन्हा, !
असा निरोप घेणे नको वाटे.
कोल्हेकरची वाचन ,साहित्याची आवड, ,माझ्यासाठी बोनस पॉईंट ठरले. माझ्या साहित्य लेखनास नुकतीच सुरूवात झाली होती.
नंतरच्या भेटीत माझ्या नव्या कथेचा वाचक असणे ", ही प्रथा सोबत असेपर्यंत मोडली नाही.
पुढे लोकल ट्रान्सफरमध्ये कोल्हेकरची बदली मी काम करीत असलेल्या एडीबी म्हणजे कृषी विकास शाखेत झाली. यामुळे कोल्हेकरच्या मैत्री -सहवासात वाढ झाली.
परभणीच्या शिवाजीनगर भागात कोल्हेकर एकटा रहात असे. दर शनिवार -रविवार ,त्याची परभणी -अमरावती ट्रीप ठरलेली होती .
पंढरपूर- अमरावती, "अमरावती - पंढरपूर " या दोन्ही एसटी बसला आम्ही " कोल्हेकर एक्स्प्रेस" म्हणायचो .
एडीबीला असतांना औरंगाबादकर श्री.आडीवरेकरसाहेब "अकाऊंटट म्हणून आले, ते कोल्हेकरचे रूम-मेट झाले.
माझ्यापुरते सांगतो- आडीवरेकर आणि कोल्हेकर या दोन चकचकीत ,गोऱ्या-गोमट्या, हसतमुख
मित्रांच्या सहवासात "त्यांच्या इतका नसेन, पण " जुन्या गबाळ्या स्टाईलने राहण्याच्या माझ्या सवयीत मोठा लक्षणीय बदल झाला."
ए.पी.सूर्यवंशी, कोल्हेकर आणि आडीवरेकर, या त्रिमूर्तींचा
"सुसंगत असा संगत-संस्कार "मला नीटनेटका बनवणारा ठरला, हे सांगण्यात आनंद आहे."
1980च्या दशकात-कंप्युटरची चाहूल पण लागलेली नव्हती.सगळी काम शाईचे पेन, बॉल-पेन, पेन्सिल -रबर"
आणि कागदावर लिहिणे, थोडक्यात " हस्ताक्षर असलेले "कार्यालयीन कामकाज " होते.
महत्वाची स्टेटमेंट्साठी " उत्तम लेखन, स्पष्ट आकडेवारी " क्लिन अँड क्लियर रायटिंग " हे महत्वाचे असे.
कोल्हेकर या स्वरूपाच्या कामातला मास्टर -हॅन्ड " .
या लेखन -श्रेणीत " माझाही समावेश होत असल्यामुळे ,
सर्व महत्वाची अँन्युअल -स्टेटमेंट्स आम्ही मिळून करायचो.
हे करतांना "टाईमपास वर्ज्य, काम उरकून टाकू" हे नसे. चिकाटी आणि संयम बाळगून ,निष्ठतेने उत्कृष्टच काम पूर्ण करायचे ", बेस्ट - क्वालिटी वर्कर" कोल्हेकरच्या सहवासात हा कार्य-मंत्र मी शिकलो .
हिंदी वर्धन "नावाचे वॉल -मॅगझीन ", मी कोल्हेकरच्या कार्यतत्परतेच्या सपोर्टने चालवले. यात मजकूर माझा, लेखन-आणि त्याची रंगीत -देखणी सजावट कोल्हेकरची.
हे वॉल मॅगझीन परभणीच्या 4 ही ब्रांचच्या हॉलमध्ये
एक एक आठवडा नोटीस बोर्डवर झळकायचे.
बँकेचे कस्टमर थांबत, आवर्जून वाचत,कौतुक करीत.
पुढे ऑफिसर म्हणून प्रमोशन झालेला कोल्हेकर अनेक ठिकाणी हेड ऑफिस लेव्हलला काम करीत फिरला, या काळात आमच्या भेटीत मोठाच खंड पडला .
त्याचा एकूण कार्य- प्रवास-
5-12-1981- परभणी मेन ऑफिसमध्ये पहिली पोस्टिंग -
पाहिले ब्रँच मॅनेजर - एम.डी.अभ्यंकर.
2.एडीबी ला असतांना
1991- कम्प्युटर ऑफिसरची टेस्ट पास केली.
कम्प्युटर ट्रेनी ऑफिसर म्हणून जुलै -1992 मध्ये प्रमोशन झाले.
कम्प्युटर ऑफिसर म्हणून स्पेशल पोस्टिंग केडर ",
1995 ते मे 2009- हा 14 वर्षांचा दीर्घ कार्य काळ, SBH लिंक सेल नागपूर येथे होता.
मे- 2009 -ते 2013 स्टेट बँक ऑफ इंडियाकडे डेप्युटशन वर SBI, GITC -CBD Belapur येथे कार्यरत.
SBI कडून परत एसबीएच कडे वापसी - झाल्यावर
2013 मध्ये PAD HO हैद्राबाद.
वास्तविक 31-10-2013 पासून त्याचे "व्हीआरस " -(कोणत्याही स्कीमविनाचे) मंजूर झालेले होते ".
त्या अगोदरच जीवावर बेतलेल्या प्रसंगातून सहीसलामत सुटका झाली.तो कठीण प्रसंग असा...
ड्युटीवर असतांना अचानक उदभवलेल्या" हार्ट प्रॉब्लेममुळे" एकटा राहणाऱ्या कोल्हेकरला स्वतःच 28-10-2013 ला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले.
अशा बिकट प्रसंगी बँकेतील अधिकारी मदातीला आले.
" एसबीएच मध्ये असेच फॅमिली कल्चरला होते.",असे तो म्हणाला.
मित्र हो -अपनी हैद्राबाद बँक बोले तो..ऐसीच थी !
..खरे आहे ना हे !
रिटायर झालेला कोल्हेकर , पारिवारिक जीवनक्रमात बिझी आहे. त्याचा बंगला- घर " दोन्ही सुंदर, सुरेख - लखलखीत असणे ", ही नवलाची गोष्ट नाही.
सुंदर कलात्मक सजावटीच्या हॉलमध्ये कोपऱ्या-कोपऱ्यात असलेल्या टीपॉयवर "क्रोशे -विणकाम " केलेले अनेक रंगी नक्षीदार कव्हर्स दिसत होते".
सौ.कोल्हेकरवहिनींनी साभिमान कौतुक- स्वरात म्हटले-
अहो ,भाऊजी ,- ही कारागिरी तुमच्या कलाकार मित्राची आहे "बरे का !
वहिनींची ही कमेंट शंभर टक्के खरी आहे .
" कोल्हेकर कलाकार आहे, कलावन्त मनाचा रसिक मित्र आहे". त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाने असाच कोल्हेकर अनुभवलेला आहे.
श्री.व सौ.कोल्हेकरांनी त्यांच्या घराभोवती असलेल्या बागेतून मला फिरवून आणले, पानं-फुलं, झाडे-वेली "यांनी
"कोल्हेकर-बाग " बहरलेली होती.
पांढरे गुलाब "लागलेल्या झाडासमोर मला उभे करीत कोल्हेकर म्हणाला--
या गुलाबाची एक खास गोष्ट आहे,
हा बिन-काट्याचा गुलाब आहे ",!
त्याच्याकडे पाहत मी म्हणालो-
जब इस बाग का माली ही, " खुद एक नरम दिल गुलाब है ।
" मग "इथल्या गुलाबाल ,काटे कसे असतील ?
बागेतली हिरवाई , कोल्हेकरची एनर्जी" हे दोन्ही
एव्हरग्रीन " आहेत "
३१ ऑगस्टला कोल्हेकरवहिनी त्यांच्या नोकरीतून निवृत्त झाल्यात, या दोघांनाही निरामय आरोग्य शुभेच्छा देत ,
या सदाबहार मित्राला भारावलेल्या मनाने मी
बाय बाय केला.!
----------------------------------------
लेख- मित्र-पुराण-
3 के- कर्तव्यतत्पर- कर्मनिष्ठ -कलावंत -मित्र
राजेंद्र कोल्हेकर.
ले-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
--------------- --------------------
Comments
Post a Comment