नवा आरंभ - माझे लेखन

माझ्या सर्व वाचक-मित्रांना नमस्कार नव्या ब्लोगवर नवे लेखन तुमच्यासाठी उपलब्ध करुन देतो आहे , नेहमीप्रमाणे तुमचा वाचन प्रतिसाद मिळत राहो . इथे तुम्हाला माझे सर्व साहित्य ..उदा .. मराठी आणि हिंदी भाषेत ..माझ्या कथा ,कविता , लेख , आणि बाल-साहित्य .. सगळ साहित्य तुम्ही इथे वाचू शकाल .. .. आपला - अरुण वि.देशपांडे -पुणे. ------------------------------------- आरंभ - करतो ..कवितेने .. -------------------------------- कविता - नवीन वाट --------------------------------------------- कठीण असते फार चालणे नवीन वाट गर्दीची, वर्दळीची सरधोपट साधी वाट टाळती सारेच ते, जे चालती नवीन वाट ध्येय साधणे उद्दिष्ट त्यासाठी प्रयत्न करावा आरंभ करावा जिद्दीने चालावी नवीन वाट राजरस्ते वाटे सोयीचे त्यात प्रलोभने फार विनाश्रम मिळवणे त्यात नसे काही सार आपण शोधावी एक स्वतंत्रशी पाऊलवाट ध्येय गाठण्या मनातले चालावी ही नवीन वाट -------------------------------- कविता -नवीन वाट -अरुण वि.देशपांडे-पुणे 9850177342 ---------------------------------

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लेख- मित्र -पुराण- राजेंद्र कोल्हेकर